धाराशिव (प्रतिनिधी)- अनेक वर्षांपासुन सातत्याने साहित्य चळवळ जोपासत असलेल्या व दिवाळी अंक प्रकाशनाची परंपरा चाल वणाऱ्या अक्षरवेल साहित्य मंडळाच्या 'अंकुर ' दिवाळी अंकाचे नुकतेच थाटात प्रकाशन झाले.

अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त अक्षरवेल मंडळाने यावर्षी अहिल्याबाई होळकर यांच्यावर विशेषांक काढला आहे. या अंकाचे प्रकाशन अपूर्वाई प्रकाशन, पुणे यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. मीना जिंतुरकर व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रेमाताई पाटील या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात मोक्षा करवर यांच्या सुरेल शारदा स्तवनाने झाली. प्रास्ताविक अक्षरवेल मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुलभा देशमुख यांनी केले. त्यावेळी त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला मिळाल्या बद्दल व तारा भवाळकर यांनाअखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिल्याबदल अभिनंदनाचे ठराव मांडले. मंडळाच्या मार्गदर्शक अनार साळुंके यांनी मार्गदर्शन केले. दिवाळी अंकाच्या संपादक डॉ. रेखा ढगे यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षा कमलताई नलावडे यांनी मंडळाच्या सदस्यांच्या लेखनाच्या कक्षा रुंदावत असून अनेक लेखिका , कवयित्रीचे साहित्य राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले असून या माध्यमातून धाराशिव चे नाव सर्वदूर पसरण्याचे काम या माध्यमातून होत आहे. याचे समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयश्री फुटाणे यांनी केले. आभार प्रदर्शन अर्चना गोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष स्नेहलता झरकर /अंदुरे, प्रा विद्या देशमुख, सचिव अपर्णा चौधरी, कोषाध्यक्ष शिवनंदा माळी तसेच अक्षरवेलच्या सर्व सदस्य व शहरातील रसिक मैत्रिणी उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात गझल, मुशायरा ठेवण्यात आला होता. यावेळी अनेकींनी  आपल्या बहारदार गझल सादर केल्या. याच कार्यकमात डॉ. रेखा ढगे यांच्या ' ऐक ना गं आई ' व अर्चना गोरे यांच्या देवार्चना ' या कविता संग्रहांचे प्रकाशन करण्यात आले.


 
Top