तुळजापूर (प्रतिनिधी) - शहरातील शुक्रवार पेठ पाण्याची टाकी ते हाडको वसाहतीकडे जाणारा प्रमुख सिमेंट रस्ता पाऊस पडताच पाण्यात जात असल्याने या रस्त्यावर मार्गक्रमण करणे कठीण होत आहे. या रस्त्यावरील पाणी निचरासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडुन होत आहे.
सदरील रस्त्यावर मध्य भाग खाली झाल्याने येथे पाणी साचते हे पाणी निचरास जागाच नसल्याने दोन-दोन दिवस रस्ता पादचा-यांना जाणे कठीण बनते. यातुन वाहन नेल्यास आजुबाजुला पाणी उडते. तरी हा रस्ता तात्काळ पाणीमुक्त करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.