धाराशिव (प्रतिनिधी)-15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी काही क्रांतिकारी, सत्याग्रह, स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी महापुरुष यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यावर आधारित परीक्षा द्यावी असा उपक्रम एमकेसीएल द्वारे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविला गेला. श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील विशेष कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमकेसीएल मान्यताप्राप्त अधिकृत प्रशिक्षण केंद्र अण्णा इन्फोटेक तर्फे दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी हि परीक्षा घेण्यात आली. श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव येथील नीट व जेईई अभ्यासक्रमाकरिता कार्य करणाऱ्या गुरुवर्य के.टी. पाटील फाउंडेशन वर्गाच्या इयत्ता 5 वी ते 10 वी च्या एकूण 584 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यामध्ये पुढील विद्यार्थ्यांनी आपापल्या इयत्तेमधून क्रमांक पटकावला.
इयत्ता 5 वी - कदम सानवी विवेकानंद, जावळे समर्थ रामराजे, काकडे सुरज बालाजी, इयत्ता 6 वी - पडवळ अथर्व तानाजी, चव्हाण समर्थ प्रमोद, अडसूळ आरोही महेंद्र, इयत्ता 7वी- राजमाने सानवी सत्यनारायण, माळी वैष्णवी जीवन, लोखंडे अर्जुन नेताजी, इयत्ता 8 वी- चित्राव समिक्षा अविनाश, देशमुख आदेश चंद्रसेन , पवार सर्वेश संतोष, इयत्ता 9वी- म्हेत्रे वरद, वडणे रुद्र रत्नदीप, इंगळे सुजाता सतिश, इयत्ता 10 वी - माने सिद्धी नरसिंग, जाधव अनुष्का, चव्हाण अथर्व गोविंद या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, गुरुवर्य के टी पाटील फाउंडेशन वर्गाचे प्रमुख व्ही.जी. आंबेवाडीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अण्णा इन्फोटेक चे चेअरमन आदित्य सुधीर पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. सदर परीक्षा घेण्याचे कार्य अण्णा इन्फोटेकचे आदित्य पाठक व अथर्व पाठक यांनी केले. सदर परीक्षेसाठी गुरुवर्य के. टी. पाटील फाउंडेशन वर्गाचे प्रमुख व्ही.जी. आंबेवाडीकर यांचे मार्गदर्शन लाभले. सदर परीक्षेकरता फाउंडेशन वर्गात अध्यापन सर्व स्टाफ उपस्थित होता.