तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव येथील रमाकांत शिंदे हे पोलिस उपनिरीक्षक या पदावरुन सेवा निवृत्त झाल्याबद्दल त्यांचा मिञ परिवाराचा सत्कार करण्यात आला.
पोलिस उपनिरक्षक रमाकांत शिंदे यांनी तुळजापूर शहर बीट अंमलदार, मंदिर पोलिस उपनिरीक्षक उमरगा मुरुम येथे काम केले आहे. नतंर त्यांची बदली पोलिस नियंञण कक्ष बीड येथे होवुन येथे सेवानिवृत्त झाले. या सत्कार पोलिस उपनिरक्षक रमाकांत शिदे यांचे गुरुवर्य उदयसिंह राजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, माजी नगराध्यक्ष बापुसाहेब कणे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी पाटील, मोरे, जाधव, शिंदे पोलिस खात्यातील आजी-माजी अधिकारी, कर्मचारीसह पञकार प्रतिष्ठात नागरिक मिञमंडळ नातेवाईक मोठ्या संखेने उपस्थित होते.