तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे महिला सक्षमीकरण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 24 सप्टेंबर या राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून तुतारी भित्तिपत्रिकेचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार म्हणाले की, आज महिला सामाजिक दृष्ट्या सुरक्षीत असणे गरजेचे आहे. प्रचलित शिक्षणव्यवस्थेतुन समाजाला किंबहुना राष्ट्राला अपेक्षित असणारे सभ्य नागरिक निर्माण होणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्ताने ते म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देशाला उत्तम, संस्कारी नागरीक प्राप्त होतात. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुण समाजातील सामाजिक विषमता जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यातुन समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी निर्माण होते. मुलींनी भिती न बाळगता व्यक्त होणे गरजेचे आहे. कारण भिती कायमस्वरूपी मनात राहिली तर मुलींचे भविष्य घडणार नाही. आयुष्यात अभ्यासाचे योग्य नियोजन व आपल्या भोवतालच्या परिसरातील योग्य अभ्यास,या दोन्ही बाबींचा विचार करून आपल्या भविष्याची बांधणी करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख डॉ. सी. आर. दापके यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. एफ.एम.तांबोळी यांनी केले. सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. विवेकानंद चव्हाण यांनी मानले.

 
Top