उमरगा (प्रतिनिधी)- पंढरपूर, लातूर व नेवासा येथे धनगर जमातीच्या एसटी प्रवर्ग अंमलबजावणीसाठी चालू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उमरगा येथे स्व बाळासाहेब ठाकरे चौकात उमरगा तालुका सकल धनगर जमातीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जमात बांधवांसमोर 

डॉ. आर. डी. शेंडगे, डॉ. विजयकुमार बेडदुर्गे, प्रा. डॉ. महेश मोटे, कालिंदा घोडके, शिवाजीबुवा गावडे, मोहनराव दूधभाते, राघवेंद्र गावडे यांनी धनगर जमातीच्या एस टी प्रवर्ग अंमलबजावणी संदर्भात मनोगत व्यक्त केले.

धनगर एसटी अंमलबजावणीमध्ये इतर कोणत्याही जमातीचे नुकसान होणार नसून त्यांच्या मुळ आरक्षणाला कसलाच धक्का लागणार नसून कांहीं नेते खोडसाळपणाने लोकांमध्ये भ्रम पसरावत असल्याचे नमूद केले. आमचा मुळचा एनटी -क कोटाच आम्हाला असणार असल्याने भ्रम पसरवणा-यांनी मनोभावे स्वागत करावे असे आवाहन केले. गजढोल ताशांचा गजर करत आरक्षण विषयक घोषणांनी परीसर दणाणून सोडला.

आंदोलकांनी उमरगा येथील मुख्य मार्ग दोन रोखून ठेवला होता. दरम्यान नायब तहसीलदार रतन काजळे यांनी आंदोलन स्थळी येवून निवेदन स्विकारले व मागणीचे निवेदन शासनाला पाठविण्याची ग्वाही दिली. तसेच पोलिस ठाणे उमरगाचे श्रीकांत भराटे यांच्या नियंत्रणात चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी बी. एच. बेडदूर्गे, डॉ. किशोर घोडके, डॉ.विक्रम जीवनगे,जालिंदर सोनटक्के,सरपंच शिवाजी सुरवसे, देविदास बनसोडे,प्रा सायबण्णा घोडके, ॲड अरूण हेडे, नगर सेवक गोविंद घोडके, प्रा. विकास दूधभाते, राजू दुधभाते, प्रा. आप्पाराव सोनकाटे, खंडू दूधभाते, संभाजी दुधभाते, वसंत सुर्यवंशी, मारुती घोडके, तानाजी घोडके, प्रा कमलाकर मोटे, सरपंच कालिदास लवटे, दिलीप बनसोडे, विजयकुमार सोनकटाळे, काशिनाथ दूधभाते, गौतमीबाई होळकर महिला संघटना, गुंजोटी येथील अहिल्यादेवी प्रतिष्ठान कार्यकर्ते यांच्यासह तालुक्यातील शेकडो महिला व पुरूषांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. सुत्रसंचालन प्रशांत अडसुळे तर आभार राजू धनकटे यांनी मानले.

 
Top