परंडा (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंजा येथे श्री गणेश बँक सेवा केंद्र व श्री पाटील बुवा जि प प्रोडुसर कंपनी लि.भोंजाचे सर्वेसर्वा डायरेक्टर गणेश नेटके यांचा वाढदिवासा निमित्त शुक्रवार दि. 6 रोजी मागील वर्षी केक न कापता अनोखा उपक्रम राबवुन “झाडे लावा झाडे जगवा“ या संदेशातून विद्यार्थी यांना जागृत करून शालेय शिक्षक वृंद यांनी सत्कार केला होता तर या वर्षी देखील लघुउद्योग सल्लागार डायरेक्टर गणेश नेटके यांचा वाढदिवस रोपटे भेट देऊन साजरा करण्यात आला. तसेच इतर खर्च टाळून सर्व शालेय विद्यार्थी यांना वही व पेन देऊन शालेय परिसरातील सर्व प्रकारच्या जोपासलेल्या झाडांची पहाणी करण्यात आली.

यावेळी कवी मुख्याध्यापक  बाळासाहेब घोगरे, सरपंच समाधान कोळी, शालेय अध्यक्ष सुब्राव मोरे, उद्योजक देविदास सरवदे, शिक्षक वृंद सोमनाथ पवार, आदिकराव शेळवणे, श्रीमती.राऊत अदी उपस्थित होते.


 
Top