परंडा (प्रतिनिधी)- येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा व पोलीस किसान गन्ना राजा पंढरपूर व महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादन संघ उंदरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये भव्य राज्यस्तरीय शेतकरी मेळावा पालक परिसंवाद शुक्रवार दि.6 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचा आडसाली ऊस मार्गदर्शन शिबिर हा मुख्य विषय होता.
या मेळाव्यासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून कृषिरत्न बी बी ठोंबरे अध्यक्ष नॅचरल शुगर व अलाईड इंडस्ट्रीज रांजणी यांची उपस्थिती होती तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नानासाहेब कदम पोलीस किसान गन्ना राजा पंढरपूर तसेच श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांची उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर कृषी भूषण पांडुरंग आव्हाड संचालक नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज राजनी तालुका कळंब हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केले . यावेळी नानासाहेब कदम यांचा परिचय प्रा किरण देशमुख यांनी केला . नानासाहेब कदम यांनी आडसाली ऊस संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले . पांडुरंग आव्हाड यांनी उसापासून तयार होणाऱ्या वीजनिर्मिती बायोगॅस व इतर प्रकल्पाबाबत सखोल असे मार्गदर्शन केले.भविष्यात विमानाला लागणारे इंधन यासाठी सुद्धा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी कै.रा गे शिंदे गुरुजी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला.त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की कोविड-19 तपासणीची लॅब ही लोकवर्गणीतून उभा केलेली पहिली लॅब असून धाराशिव उपकेंद्रांमध्ये जी लॅब उभा केली आहे त्यामध्ये बी बी ठोंबरे यांचा मोठा वाटा आहे.विद्यापीठ उपपरिसरामध्ये लावण्यात आलेल्या 5500 झाडांपैकी एक हजार लिंबाची झाडे बी बी ठोंबरे यांनी दिली आहेत.सामाजिक बांधिलकी जपत असताना कॅन्सरग्रत रुग्णासाठी लातूर येथे ठोंबरे साहेबांचे फार मोठे योगदान लाभले आहे. नानासाहेब कदम यांनी आपल्या भाषणामध्ये आडसाली ऊस पद्धतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान चा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन कसे काढता येईल या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.कृषिरत्न बी बी ठोंबरे यांनी आपल्या मनोगतामध्ये मार्गदर्शन करताना सांगितले की ब्राझीलची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे कृषीवर आधारित आहे तेव्हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळले पाहिजे.छोटे छोटे लघुउद्योग सुरू केले पाहिजेत.नोकरीच्या मागे न लागता रोजगार उपलब्ध होतील अशा संधी शोधल्या पाहिजेत.शिक्षण महर्षी रा गे शिंदे महाविद्यालय हे ग्रामीण भागातील उत्कृष्ट कौशल्य विकास आधारित शिक्षण देणारे महाविद्यालय असून या महाविद्यालयाचा व या संस्थेचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . या महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख पाहताना मन भरून येतं.संस्था सचिव संजय निंबाळकर यांनी या महाविद्यालयाच्या विकासासाठी भरघोस योगदान दिले आहे.धाराशिव जिल्ह्यातील सर्वोत्तम महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाची ओळख निर्माण झाले आहे.डॉ महेशकुमार माने यांनी कृषीरत्न बी बी ठोंबरे यांचा परिचय करून दिला . यावेळी श्रीमती सुनंदा कोठुळे यांनी त्यांच्या पतीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाविद्यालयात गुरुजींच्या पुतळा उभारण्यासाठी 11000 रुपयाचा धनादेश संस्था सचिव संजय निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केला . यावेळी त्यांचा मुलगा गोविंद कोठुळे अक्षय कोठुळे व रा.गे . शिंदे गुरुजी यांच्या सून श्रीमती पद्मा शिंदे यावेळी उपस्थित होत्या . यावेळी महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडा प्रकारामध्ये प्राविण्य निर्माण केलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले .यावेळी सर्व मान्यवरांनी महाविद्यालयाची पाहणी केली व महाविद्यालयाचे कौतुक केले .याप्रसंगी परंडा शहरातील व तालुक्यातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले . शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रा दीपक हुके यांनी मांनले.