परंडा (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल परंडा भाजपाच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, परंडा न.प. माजी गटनेते सुबोधसिंह ठाकूर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा चिटणीस विठ्ठल तिपाले, तालुका सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, ॲड. तानाजी वाघमारे, ॲड. भालचंद्र औसरे, तुकाराम हजारे, अनिल पाटील, साहेबराव पाडुळे, फारुख मुलानी, विलास गायकवाड, शिवाजी पाटील, जयंत पाटील, उमाकांत गोरे, अजित काकडे, रामकृष्ण घोडके, मनोहर पवार, धनंजय काळे, गौरव पाटील, सुरज काळे, अविनाश विधाते, अमर ठाकूर, दत्ता ठाकरे, परसराम कोळी, डॉ. अमोल गोफणे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सनुतन खोसरे, महिला मोर्चा शहराध्यक्षा ज्योती भातलवंडे तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.