धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्या गुणवंत खेळाडूंना करिअर आणि भवितव्याच्या दृष्टीने चांगले दिवस असून राज्य शासनाने 60 खेळाडू वर क्रीडा विभागात नोकरीत थेट नियुक्ती दिल्याचे ज्वलंत उदाहरण असल्याचे मत नितीन काळे यांनी व्यक्त केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेच्या वतीने आयोजित लातूर विभागीय शालेय ज्युदो स्पर्धेचे उद्घाटन धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नाराजी जिल्हा लॉन टेनिस संघटनेचे अध्यक्ष युवराज नळे,  धाराशिव जिल्हा ज्युदो संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, उपाध्यक्ष अमर सुपेकर, क्रीडा अधिकारी अक्षय बिराजदार, क्रीडा मार्गदर्शक डिंपल ठाकरे, जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे सचिव वामन गाते, तांत्रिक समिती सचिव कैलास लांडगे, साई राठोड, सचिन कोकीळ आदिलसह खेळाडूंची प्रमुख उपस्थिती होते. 

या स्पर्धा 14 17 आणि 19 वर्षे वयोगटातील मुले मुलीत घेण्यात येणार असून स्पर्धेत धाराशिव, लातूर शहर, लातूर ग्रामीण, नांदेड शहर, नांदेड ग्रामीण येथून 250 खेळाडूंनी  नोंदवला आहे या स्पर्धेतून पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेसाठी जिल्ह्यातील खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

स्पर्धेचे यशस्वीतेसाठी कैलास लांडगे, अश्विनी कुणगे, साई राठोड, मनोज जाधवर, अथर्व खंडागळे, आदित्य काळे, ऋतुराज चौरे, सचिन कोकीळ, पायल कोळीज्ञआदी परिश्रम घेत आहेत

 
Top