तुळजापुर (प्रतिनिधी)- तालुक्यांतील इटकळ येथे श्री. लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा मोठया उत्साहात व भक्तिमय अशा वातावरणात गुरुवार दि.12 रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संपन्न झाला.
सायंकाळीं 6 वाजता श्री संत एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायण ग्रंथाचे पुजन करून ग्रंथ वाचन निरुपण सेवेस प्रारंभ करण्यात आला. श्री.भावार्थ रामायण ग्रंथ युद्ध कांडातील अध्याय 43 ते 49 अशा सात अध्यायातील 1135 ओव्याचे वाचन व निरुपण करण्यात आले व शुक्रवार दि.13 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता या लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळ्याची सांगता करण्यात आली.या श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा कार्यक्रमास येवती, हिप्परगा ताड, उमरगा चि., अणदूर, फुलवाडी, राकेल, मुर्टा, बिजनवाडी, दिंडेगाव, खानापुर, केशेगाव, काळेगाव, केरुर, धोत्री, पाटोदा, सकनेवाडी, कानेगाव आदी गावांतील वाचक सूचक रामभक्त उपस्थित राहून निरपेक्ष सेवा केली. हा श्री.लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा कार्यक्रम तब्बल 12 तास चालला उपस्थीत श्रोते राम नामात मंत्रमुग्ध झाले होते. हा श्री.लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी रामभक्त हभप. नागनाथ स्वामी, दिनेश सलगरे, काशिनाथ पांढरे, गणपत पाटील, गणेश बिराजदार, विश्वनाथ गायकवाड, प्रकाश पांढरे, रितेश माशाळकर, सागर शिंदे, अविनाश वाघमारे, विठ्ठल बिराजदार यांनी परिश्रम घेतले.