धाराशिव (प्रतिनिधी) - इंडो एशिया मेता फाउंडेशन भारत, नागेश नगरी अस्थी कलश महायात्रा समिती धाराशिव व जम्बुद्वीप बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश महायात्रेचे जिल्ह्यात आगमन झाले आहे. या महायत्रेचे स्वागत ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात व उत्साही वातावरणात मिरवणूक काढीत दि.15 सप्टेंबर रोजी करण्यात आले. दरम्यान युद्ध नको, बुद्ध हवा... महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.... आदींसह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध व डॉ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलश महायात्रेस दि.10 सप्टेंबर रोजी पुणे येथून झाली आहे. ही महायात्रा तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे आल्यानंतर या यात्रेचे जल्लोष स्वागत करण्यात आले. 

या महायात्रेत पूज्य भन्ते रेवात महाथेरो (श्रीलंका), पूज्य भन्ते पलामोधम्मो महाथेरो (व्हिएतनाम), देवमित्ता महाथेरो (श्रीलंका), पुज्य भन्ते प्रियदर्शी महाथेरो (भारत), पुज्य भन्ते होआई व्हू महाथेरो (व्हिएतनाम), पुज्य भन्ते वेलीविठीये महाथेरो (श्रीलंका) व पुज्य भन्ते धम्मसार थेरो (महाराष्ट्र) आदींचा समावेश आहे. ही महायात्रा धाराशिव जिल्ह्यात दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे दाखल झाल्यानंतर या यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सुरतगाव, तुळजापूर येथे आगमन व शहरात मिरवणूक काढण्यात आली. तर धाराशिव शहरात दाखल झाल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण घालून अभिवादन केले. त्यानंतर ही रॅली वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण चौक, लेडीज क्लब मार्गे पुष्पक मंगल कार्यालयापर्यंत वाजतगाजत काढण्यात आली. 

यावेळी या रॅलीचे पुष्पवृष्टी, बँड बाजाच्या निनादात व फटाक्यांची आतषबाजी करीत ठिकठिकाणी चौकाचौकात पुष्पवृष्टी करीत जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. तर तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशास अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या महायात्रेचे समितीचे समन्वयक पृथ्वीराज चिलवंत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ओव्हाळ, विशाल शिंगाडे, अरुण बनसोडे, अतुल लष्करे, दीपक सरवदे, गणेश वाघमारे, सुनील बनसोडे, राजन जोगदंड, ऍड रामचंद्र ढवळे, विनोद जानराव, नितीन लांडगे, विजय गायकवाड, राजेंद्र आंगरखे, सचिन दीपक, अजय सरवदे, प्रशांत सोनवणे, बाबासाहेब जानराव, विद्यानंद वाघमारे, भाऊसाहेब अणदूरकर, दत्तात्रय लोखंडे, आशाताई कांबळे, रेश्मा घरबुडवे, आशा शिंगाडे, ललीता शिंगाडे, उषा भालेराव, अनोखी वाघमारे, शिला जानराव, मिरा शिंदे, कल्पना कांबळे, काजल गायकवाड, शिला पवार, जयश्री चंदनशिवे, आशा हजारे, संध्या माळाळे, काजल माळाळे, सृष्टी वाघमारे, कोमल भोसले, शोभा खंडागळे, कोंडाबाई सिरसाठ आदींसह बौद्ध बांधव, उपासक व उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top