कळंब (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने शेतकरी कर्जमाफीची दोन लाखापर्यंतची मर्यादा ओलांडून तीन लाखापर्यंत करण्यात यावी व ई - पीक पाहणी अट रद्द करावी. अशी मागणी महाराष्ट्र शेतकरी जनहित कामगार मंचाच्यावतीने कळंबचे तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .

महाराष्ट्र शेतकरी जनहित कामगार मंच यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शेतकरी जनहित कामगार मंचाच्या वतीने आपण शेतकऱ्याची दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची मर्यादा ओलांडून ती तीन लाख रुपये एवढी मर्यादा करण्यात यावी. तसेच बऱ्याच  गावातील शेतकऱ्यापुढे सन 2023 च्या ई-पिक पाहण्याची अट रद्द करून प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या मार्फत मिळणाऱ्या प्रति हेक्टरी 5000 रुपये अनुदानास प्रत्येकास पात्र करून अनुदान देण्यात यावी. अशी ही मागणी यावेळी महाराष्ट्र शेतकरी जनहित कामगार मंचाच्यावतीने करण्यात आली आहे. हे निवेदन या मंचाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप वाकचौरे यांच्या वतीने देण्यात आली आहे.  

 
Top