धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सखी सावित्री समिती स्थापन करण्यात आली.
या समितीद्वारे प्रशालेतील विद्यार्थांच्या आरोग्यासाठी शिबीरे आयोजित करणे , कोणत्याही अत्याचाराला विद्यार्थी बळी पडणार नाही, याची खात्री देणे, शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याचाराबाबत तक्रार करण्यासाठी पोस्को कायद्यातील ई बॉक्सची माहिती देणे, चिराग ॲप, 1908 या चाईल्ड हेल्पलाईन बद्दल माहिती देणे, शाळेत समतेचे वातावरण रहावे यासाठी लिंगभेद विरहित व सर्व समावेशक उपक्रम राबविणे. त्यांच्या शारीरिक, भावनिक व बौद्धीक विकास व त्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांचे व पालकांचे समुपदेशन करणे त्याचबरोबर सजग पालकात्वासाठी कार्यशाळेचे आयोजन करणे. या सारख्या विविध उपक्रमाची अंमलबजावणी प्रशालेत करण्यासाठी समितीतील सर्व सदस्यांनी तत्पर रहावे, असे आवाहन या समितीचे अध्यक्ष कुमार निकम यांनी सुरुवातीला केले.
यावेळी या समितीतील सदस्य आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनघा गोडगे, तज्ञ विधिज्ञ तेजश्री पाटील, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपीका सस्ते, डॉ. आरती डंबळ, पर्यवेक्षिका बी.बी. गुंड, समुपदेशक श्रीमती पी. बी.मेटे, श्रीमती ए.ए. देशमुख, एम.एम धावणे, एस. डी. बिरगड, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी व समितीचे अध्यक्ष कुमार निकम व प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे उपमुख्याध्यापक प्रमोद कदम आणि या समितीचे कार्यवाह रामेश्वर सिरसट उपस्थित होते.