कळंब (प्रतिनिधी)- एस. टी. कर्मचा-यांनी आपल्या विविघ मागणी साठी पुकारलेल्या बेमुदत संपाचा फटका कंळब आगाराला जवळपास दिवसा काठी 15 लाखाचा फटका बसला आहे .या संपात अनेक संघटनांनी सहभाग नोंदवून संप केला. तर काही संघटनांनी या संपाला नाकारून आपल्या कर्तव्यावर जाणे पसंत केले व काही बोटावर मोजण्या इतक्याच फेऱ्या कळंब आगारात झाल्या. त्यामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यात संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
यात कळंब आगारातून दररोज 82 बस च्या 249 फेऱ्या मारुन जवळपास 45 हजार कीमी चा प्रवास करून रापमहामंडळ 10 ते 15 लारवा चे उत्त्पन्न मिळवते. त्यातच गणपती चा सण तोंडावर असतानाच महामंडळा चे फार मोठे नूकसान होत आहे . या बंद मुळे प्रवाशांचे मोठे हाल होते आहे .या संपामुळे अनेक प्रवाशांचे बेहाल झाले तर शाळकरी विद्यार्थ्यांना मात्र या संपाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर खाजगी वाहतूक दार मात्र प्रवाशांची मोढी अर्थिक लूट करत आहेत. महाराष्ट्र स्टेट परिवहन महामडंळातील कामगाराची पगारवाढ बरेच दिवसापासून प्रलबिंत आहे.केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागु करावा ही कामगार सघंटनाची मागणी आहे.
या मागणी करीता महाराष्ट्र स्टेट परिवहन कामगार सघंटना ही एकमेव सघंटना मान्यता प्राप्त आहे. या सघंटनेने पगारवाढीच्या मागणी करीता संप करावा का नाही कामगार यानी संप करावा या बाजुने कौल दिला. इतर सहकारी सघंटना सोबत घेवुन संपाची नोटीस दिली याची दखल परिवहन मंत्री व परिवहन महामंडळाचा व्यवस्थापनाने घेतली नाही. दिखावा म्हणून अनेक वेळा कृती समितीचे पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा केली पण निर्णय घेतला नाही. म्हणून संप सुरु करण्याची घोषणा केली. संप सुरु करुन संप मागे घेण्याचे सपंकरी कृती समितीच्या सघंटनाना आव्हान केले. माञ कामगार सघंटनाच्या नेतृत्वाने ते नाकारले व बेमुदत संप सुरु केला.या सपांत एस.टी.कामगार सघंटना सपांचे सामुदायिक नेतृत्व करत आहे. संप 100% सुरु असल्यामुळे सरकारचे धाबे दणाणलेले आहे.