धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील उंबरे कोठावरील निवासी व कोर्टा शेजारी समर्थ नगर भागातील झेरॉक्स कॉम्प्युटरचे व्यवसायिक बाळासाहेब उर्फ महादेव लक्ष्मण चव्हाण वय 42 यांचे हृदयविकाराच्या झटक्याने बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सकाळी जिम मध्ये व्यायाम करताना दुःखद निधन झाले. त्यांच्यावर औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाळासाहेब चव्हाण यांच्या मागे आई, वडील, बहीण, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, पुतने असा परिवार आहे. ऐन तरूण वयात बाळासाहेब चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 
Top