तुळजापूर (प्रतिनिधी)- माझा भाजप प्रवेश ही अफवा असुन मला जनतेचा मिळालेला प्रतिसाद पाहुन माजी प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. असे माजी आमदार मधुकर चव्हाण यांनी बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह येथे पञकार परिषद घेवुन केले.
यावेळी बोलताना चव्हाण पुढे म्हणाले कि, मी काँग्रेसचा तुळजापूर विधानसभेसाठी इछुक उमेदवार आहे. मी केलेल्या विकासकामांचा जोरावर मतदारांसमोर जाणार आहे. मी 21 टीएमसी पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले. आता किती आले हे पहा. मी दूरदृष्टी ठेवुन विकास कामे केल्याने त्याचा लाभ तालुक्यातील जनतेला होत आहे. बँनर लावून जाहीरात करुन विकास होत नसतो असे यावेळी म्हणाले. मी कुणावर आरोप करणार नाही. सरकारने मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण दखल तात्काळ घेणे गरजेचे आहे. अन्यथा होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल असे यावेळी म्हणाले. मी जनता व अधिकारी वर्गाशी चर्चा करुन विकास कामे करीत होतो. त्यामुळे विकास करतांना संघर्ष वातावरण निर्माण झाले नसल्याचे शेवटी म्हणाले. यावेळी मुकुंद डोंगरे, अभिजीत चव्हाण, शिवाजी गायकवाड, रुषीकेश मगर, अँड. ढवळे, रवि कापसे उपस्थितीत होते.