धाराशिव (प्रतिनिधी)- दि 29 सप्टेंबर रोजी धाराशिव तालुक्यातील श्रीक्षेत्र सिध्देश्वर मंदीर, वडगाव या सभागृहामध्ये होत असलेल्या संत-महंत (धर्माचार्याच्या) भव्य जिल्हास्तरिय संम्मेलनामध्ये प्रवचनकार, किर्तनकार आदी भक्तगणांनी अधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन 'संत सेवा समिती' व ह.भ.प. ॲड. गजानन चौगुले महाराज यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे.

सदर सम्मेलनामध्ये उपस्थित होणाऱ्या व इतर संत-महता -चे देशाच्या व समाजाच्या एकात्मतेसाठी मोलाचे योगदान - मिळत आलेले आहे. भविष्यातील देखिल त्यांच्याकडून राष्ट्रौध्दाराचे व धार्मिक संवर्धनाचे कार्य त्यांच्या किर्तन-प्रवचनव्दारे योग्य पध्दतीने होत राहावे यासाठीच उपस्थित धर्माचार्याना संबोधित करण्यासाठी भोर किर्तनकार गुरुवर्य ह.भ.प. संदिपान महाराज शिंदे, हासेगावकर तसेच गुरुवर्य ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले तसेच गुरुवर्य ह.भ.प. महेश महाराज कानेगावकर, तसेच वेंदाताचार्य सोलापूरचे लक्ष्मण महाराज चव्हाण, पूज्यनीय मंहत ईच्छागिरी महाराज व ह.भ.प. सौ. सुनिताताई आडसूळ महाराज बाणि ह.भ.प. जनार्धन महाराज मेटे, प्रांत धर्माचार्य प्रमुख (विहिप) हे विविध विषयी मोलाचे मार्गदर्शन उपस्थित राहून करणार आहेत. सदर सम्मेलन वरिल रोजी 17 वे वाजता 4 वाजता समाप्त होईल, अशी माहिती व्यवस्थापकानी दिली.

 
Top