धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव शहराला उजनी धरणातून पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र सतत विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले आहे.

धाराशिव शहरात उजनी धरणातून पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र सध्या पावसाळ्याचे वातावरण व वादळ होत असल्यामुळे विद्युत प्रवाह सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे पाणी उचलण्यास तांत्रिक अडचण निर्माण होत असल्यामुळे शहरातील नागरिकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. पावसाळ्याचे दिवस असले तरी वरील कारणामुळे वेळेवर पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करावी, असे आवाहन मुख्याधिकारी वसुधा फड यांनी केले आहे.

 
Top