तुळजापूर (प्रतिनिधी)-   महाराष्ट्राची कुलस्वामीनी कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या यंदाचा  शारदीय नवराञात विधानसभा निवडणुक व समाधानकारक पाऊस झाल्याने भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे.  श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डाँ. सचिन ओम्बासे वगळता इतर बहुतांशी  अधिकारी वर्ग नवखा व त्यांना प्रथमच शारदीय नवराञ उत्सवास सामोरे जावे लागणार आहे.  शारदीय नवराञ महोत्सव निर्विघ्नपणे पार पाडणे त्यांच्यासाठी त्यांच्या उज्वल कारकीर्दीसाठी आवाहन असणार आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी संजय ढवळे, श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार माया माने, धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले,  पोलिस निरक्षक रविद्र खांडेकर, मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार हे यात्रा निविध्न पार पाडण्यासाठी महत्त्वाची भुमिका असणाऱ्या अधिकारी वर्गासाठी श्रीतुळजाभवानी शारदीय नवराञ यात्रेस प्रथमच सामोरे जावे लागत आहे.

श्रीतुळजाभवानी शारदीय नवरा उत्सव एक दिवसाचा नसतो तर सलग सोळा ते सतरा दिवसाचा असतो. यात जवळपास पंचवीस ते तीस लाख भाविक दर्शन्ाासाठी येतात. यंदा विधानसभा निवडणुक व समाधानकारक पाऊस झाल्याने  विक्रमी संखेने भाविक येण्याची शक्यता आहे. याञा काळात स्थानिक  अधिकारी वर्ग, कर्मचारी यांना सलग सोळा ते सतरा तास काम करावे लागते. यात्रेत दर्शनार्थ येणारा वर्ग हा स्ञी-पुरुष धार्मिक वृत्तीचा असतो. तो गुन्हेगार वृत्तीचा नसतो. त्यामुळे त्यांना हाताळताना आपुलकिच्या नात्याने हाताळावे लागते. त्यांच्याकडुन अनावधानने चुक झाली तरीही त्याकडे दुर्लक्ष करावे लागते. याकाळात पायी चालत लाखोच्या संखेने महाराष्ट्रासह  कर्नाटक, आंध्र, तेलगणा  येथील सर्व जाती धर्माचे  भाविक येतात. त्यांना  सुलभ दर्शन घडवणे व त्यांची सुरक्षा या अधिकारी, कर्मचारी वर्गाची असते. तिर्थक्षेञ  तुळजापूर येथे याञा काळात घडलेली घटना राज्याची होत्या. या पार्श्वभूमीवर याञा शांततेत पार पाडणे हे या अधिकारी, कर्मचारी यांच्या जीवावर असते. त्यामुळे हे नवखे अधिकारी यांची याञा काळात कामाची कस लागणार आहे. जो ही याञा शांततेत, निर्विघ्नपणे पार पाडतो तो राज्यातील कुठल्याही यात्रेचे आवाहन स्विकारु शकतो. याची दखल शासन दरबारी ही घेतली जाते. यंदा सेनापती जरी अनुभवी असला तरी अधिकारी सैनिकांची भूमिका यात महत्वाची ठरते.

 
Top