तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्रीतुळजाभवानी मातेच्या यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्ताने राजेशहाजी, राजमाता माँ जिजाऊ महाध्दार व नवदुर्गा विद्युत रुपात साकारली जाणार आहे.

यात राजेशहाजी महाध्दारावर दहा बाय आठ आकारात अंबाआईची विद्युत रुपात प्रतिमा साकारली आहे.  तर खालील बाजूला नवदुर्गा विद्युत रुपात साकारल्या जाणार आहेत. यासाठी नवीन पध्दतीचे उजेड देणारे एलईडी बल्ब वापरले असुन 12 व्होल्टचे एसएमडी प्रकारातील सवालाख एलईडी बल्ब  वापरले जाणार आहेत.  तसेच फ्लेचर पध्दतीची म्हणजे चमकदार विद्युत प्रकाश देणारी विद्युत योजना राबवली. पुणे येथील श्रीतुळजाभवानी भक्त टोळगे उंडाळे परिवार हे मागील  15 वर्षापासून विद्युत रोषणाई रुपात सेवा देत असुन ही सेवा वर्षभर कार्यरत असते. यांना स्थानिक सुरेश बडोदकर हे सहकार्य करतात.

 
Top