धाराशिव (प्रतिनिधी) - खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या मार्गदर्शनाखाली वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा भक्ती स्थळ ते शक्ति स्थळ (अहमदपूर ते मंगळवेढा) या प्रवासासाठी मार्गक्रमण करत असून जागोजागी या यात्रेस उदंड प्रतिसाद लाभत आहे. यात्रेच्या समारोप समारंभास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन होणार असून त्यानंतर यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. त्यामुळे या समारोप कार्यक्रमासाठी व लिंगायत समाजाची ताकद दाखवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी दि.29 सप्टेंबर रोजी मंगळवेढा येथे बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या यात्रेचे मार्गदर्शक तथा प्रमुख नवनिर्वाचित खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले.
आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचा स्वागत व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना खा गोपछडे म्हणाले की, एकेकाळी लिंगायत समाजाचे महाराष्ट्रात 27 आमदार होते. आज समाजाची राजकीय अवस्था, परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रातून केवळ एकमेव मी लिंगायत खासदार म्हणून बायपास मार्गाने दाखल झालो आहे. याचीही खंत वाटते. याचा लिंगायत समाजातील सर्व सुधारित व नेतृत्व करत असलेल्या व्यक्तींनी विचार करण्याची वेळ आली असून आपापसातील गट तट विसरून सर्वांनी एक दिलाने एका छत्रीखाली वावरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेच्या समारोपप्रसंगी लिंगायत समाजाने जास्तीत जास्त ताकदीने हजर राहून लिंगायत समाजाची आन बाण शान असलेले धर्म संस्थापक बसवेश्वर महाराज यांच्या मंगळवेढा येथे होऊ घातलेल्या स्मारकासाठी ना फडणवीस यांच्याकडून मी किमान एक हजार कोटी रुपयांचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रारंभी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर खा गोपचडे यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा जयश्री भुसारे व सचिव संजीवनी कपाळे यांनी केला. तर संस्थेचे तज्ञ संचालक तथा मार्गदर्शक हनुमंत भुसारे यांनी प्रास्ताविकात संस्थेची स्थापना ते आजपर्यंतची प्रगती याची थोडक्यात माहिती दिली . तसेच महाराष्ट्र वीरशैव सभेच्यावतीने संस्थेच्या अध्यक्ष, सचिव, संचालक व व्यवस्थापिका यांचा कर्तुत्ववान महिला म्हणून प्रशस्तीपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र वीरशैव सभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय जंगम संघटनेचे अध्यक्ष श्रावण जंगम, सचिव चंद्रकांत हुंडेकरी, यात्रेचे प्रमुख आयोजक नितीन शेटे, भाजपाचे विनोद गपाट, प्रवीण पाठक, संचालिका महादेवी करजखेडे, संगीता स्वामी, अनिता चिल्लाळ, त्रिंबक कपाळे, जंगम मठ ट्रस्टचे अध्यक्ष शिवानंद कथले, वैजनाथ गुळवे, किरण शेटे, बसवेश्वर नागरी पतसंस्थेचे श्रीकांत साखरे, डॉ निवृत्ती स्वामी, संतोष हावडे, बाबासाहेब तीर्थकर, शिक्षण विस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम, प्रवीण स्वामी, शंकर स्वामी, सारोळकर, नायब तहसिलदार गजभार, सुरेश कोरडे, सतीश चिल्लाळ, महेश करजखेडे, प्रशांत स्वामी, प्रकाश स्वामी, शैलेश कपाळे, शैल्य स्वामी, सुहास कपाळे, मनोज बारस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे तज्ञ संचालक त्रिंबक कपाळे यांनी तर आभार संस्थेच्या व्यवस्थापिका सविता विभुते यांनी मानले.