नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग शहरातील विकास कामांसाठी निधी कमी पडु देणार नाही असे आमदार राणाजगजितसिंह यांनी नळदुर्ग येथील विविध विकास कामांचे उदघाटन व विविध गणेश मंडळाना भेटी दिल्यानंतर बोलतांना सांगितले.

दि. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग शहरातील विविध गणेश मंडळाना भेटी देऊन श्री गणेशाची आरती केली. प्रारभी नळदुर्ग शहरातील श्री शिवलिंगेश्वर हिरेमठास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भेट दिली. यावेळी मठाचे मठाधीपती श्री ष. ब्र.बसवराज शिवाचार्य महास्वामीजी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. यावेळी महाराजांच्या हस्ते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर भीमनगर येथील सभागृह तसेच अंगणवाडी बांधकामाच्या कामाचा शुभारंभ सेवानिवृत्त प्रा. शिवाजी बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर इंदिरानगर येथे बांधण्यात येणाऱ्या सभागृहाच्या कामाचा शुभारंभ आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर शहरातील जय हिंद तरुण गणेश मंडळं व्यासनगर, शिवनेरी तरुण गणेश मंडळं, इंदिरानगर येथील गणेश मंडळ, दुर्गानगर व वसंतनगर येथील गणेश मंडळाना भेट देऊन आमदार राणा जगजितसिंह यांनी श्री गणेशाची आरती केली.

यावेळी बोलतांना आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले की, येणाऱ्या काळात नळदुर्ग शहराचा आणखी मोठ्याप्रमाणात विकास करण्यात येणार आहे. विकास कामासाठी निधी कमी पडु देणार नाही. शहरातील नागरीकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असेही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे सुशांत भुमकर, नारायण नन्नवरे, माजी नगरसेवक नय्यर जागीरदार, दत्तात्रय दासकर, दत्तात्रय कोरे, निरंजन राठोड, नगरसेविका छमाबाई राठोड, शहर भाजपचे अध्यक्ष धीमाजी घुगे, माजी शहरअध्यक्ष पद्माकर घोडके, बबन चौधरी, कैलास चव्हाण, आनंद पवार,संजय विठ्ठल जाधव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते व गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top