धाराशिव (प्रतिनिधी) - वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने राज्यात वीर सेवा लिंगायत समाज सन्मान यात्रा खासदार अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत आहे. या यात्रेचे धाराशिव जिल्ह्यात मराठा, धनगर, माळी, वंजारी आदी समाजासह सर्व अठरा पगड समाजाच्यावतीने मोठ्या जोरदारपणे स्वागत दि.10 सप्टेंबर रोजी केले. 

वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा राज्यातील लिंगायत समाज लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या असलेल्या 17 जिल्ह्यामध्ये भक्ती स्थळ (राजूर, अहमदपूर) ते शक्ती स्थळ (श्रीक्षेत्र मंगळवेढा) अशी लिंगायत सन्मान यात्रा खासदार अजित गोपछडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली आहे. ही यात्रा दि. 5 ते 21 सप्टेंबर या दरम्यान लिंगायत समाजातील युवक व तरुणांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी कॉर्नर बैठका गृहभेटी देऊन समाजामध्ये जनजागृती करण्याची मोहीम सुरू केली आहे. धाराशिव शहरातील अलंकार हॉटेल येथे समाजाची बैठक घेण्यात आली. तर गणेश इंगळगी यांच्या घरी जाऊन जुन्या गल्लीतील समाज बांधवांची बैठक घेतली. तसेच वीरशैव जंगम मठामध्ये राचा या स्वामी यांच्या संजीवनी समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर गणेश नगर येथील गयाई महीला नागरी सहकारी पतसंस्थेस भेट दिली. तर तेथील संत गजानन महाराज यांच्या मंदिरात समाज बांधवांची बैठक घेऊन त्यांना खा. गोपछडे यांनी संबोधित केले. तसेच धाराशिव शहरातील विविध गणपती मंडळाला भेटी देऊन खा गोपछडे यांच्या हस्ते गणेश आरती करण्यात आली. यावेळी जंगम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण जंगम, हिंदू वीर सेवा लिंगायत मंचचे राज्य संयोजक नितीन शेटे, वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचे धाराशिव जिल्हा संयोजक विनोद गपाट, मोहन मुंडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रवीण पाठक, इंद्रजीत देवकते, वीरशैव  जंगम मठाचे अध्यक्ष शिवानंद कथले, उपाध्यक्ष वैजिनाथ गुळवे, ज्योती आग्रे, रजनी आग्रे, मंजुषा आग्रे, वैभवी कानडे, सुरज शेरकर, सुजित साळुंके, गणेश इंगळगी, प्रसन्न कथले, 

आनंद गणेश मंडळाचे अध्यक्ष अजय यादव, सचिव संजय देशमुख, मिलिंद आदटराव, अमित देशमुख, उमाकांत आग्रे, रामलिंग आग्रे, प्रकाश डांगे, दिलीप डोंबे, भीमाशंकर हुकीरे, लगदिवे, श्रीनिवास आग्रे, श्रीशैल्य आग्रे, यश यलगुंडे, आकाश खराडे, सुरज खराडे आदींसह लिंगायत समाजातील युवक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी समाजास येत असलेल्या अडचणी देखील उपस्थितांकडून समजून घेतल्या. या यात्रेचे मराठा, धनगर, माळी, वंजारी आदींसह अठरा पगड समाजाच्यावतीने ठिकठिकाणी फटाके वाजवून जंगी स्वागत केले हे विशेष म्हणावे लागेल.

 
Top