धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.
शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते विश्वासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरासाठी पुणे येथील लोकायत संस्थेचे प्रशिक्षक जितेंद्र पापळे यांनी काँग्रेस विचारधारा यावर सत्र घेतले तसेच उदय देशमुख यांनी बूथ व्यवस्थापन याविषयी दुसरे सत्र घेतले.
शिबिरात जिल्ह्यातील 500 कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी जिल्हा काँग्रेसचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, मुकुंद दादा डोंगरे, तुळजापूर तालुकाध्यक्ष रामचंद्र आलुरे, प्रकाश चव्हाण, धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर, उमरगा तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, परंडा तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, भुम तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, डी.सी.सी. बँकेचे संचालक मेहबूब पटेल, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, युवा नेते ऋषिकेश मगर, माझी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, सचिव सुरेंद्र पाटील, सुजित हंगरगेकर, जुबेर शेख, नाना भोसले, विजयकुमार सोनवणे, महेश देशमुख, श्रीमती तनुजा हेडा, सुनील बडूरकर, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रेम सपकाळ, संजय गजधने, सलमान शेख, काकासाहेब सोनटक्के, समाधान घाटशिळे, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष कफिल सय्यद, युवक काँग्रेस शहराध्यक्ष स्वप्नील शिंगाडे, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष धवलसिंह लावंड, सौरभ गायकवाड, गणेश सापते आदींनी परिश्रम घेतले. शिबिराचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.