धाराशिव (प्रतिनिधी) - मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त जमाते इस्लामी हिंद युथ मुव्हमेंट व एसआयओ यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद देऊन खऱ्या अर्थाने पैगंबर यांना अपेक्षित व साजेशी जयंती साजरी केली आहे.

धाराशिव शहरातील शिरीन कॉलनीतील युनिक फॅब्रिकेशन येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, ईद मिलाद जुलूस कमिटीचे खलील सय्यद, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पार्टीचे मसूद शेख, माजी नगराध्यक्ष मोईनुद्दीन पठाण, खलील पठाण, इलियास पिरजादे, जमाते इस्लामी हिंदचे शहर अध्यक्ष समिती सजियोद्दीन शेख, युथ मुव्हमेंटचे आसिफ शेख, तौफिक पठाण, एसआयओचे शहराध्यक्ष निहाल पटेल, आयाज सिद्दिकी आदी उपस्थित होते. यावेळी विश्वास शिंदे व सजियोद्दीन

शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. रक्त संकलन धाराशिव जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीचे रक्त संकलन अधिकारी डॉ गणेश साळुंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. यावेळी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top