धाराशिव  (प्रतिनिधी) - येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे पर्यवेक्षक  आर. बी. जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांच्या नेतृत्वाखाली व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे भूकंप व आग विरोधी मॉकड्रिल यशस्वीरित्या घेण्यात आले . विविध अभिरूप अनुभवांचा उपयोग करून हे प्रशिक्षण देण्यात आले .

 विद्यार्थ्यांना नैसर्गिक किंवा कृत्रिम आपत्तीत स्वतःचे  आणि इतरांचेही रक्षणासाठी  काय करावे याचे प्रत्यक्ष अनुभव या मॉक ड्रील च्या माध्यमातून प्रशालेत देण्यात आले .   यावेळी पर्यवेक्षक धनंजय देशमुख , एन .एन . गोरे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top