धाराशिव (प्रतिनिधी) - अभियंता नागनाथ काळे व धनराज नाईकवाडी यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महेश भगत यांनी त्यांचा येथोचित सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्यावतीने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाखा अभियंता काळे व नाईकवाडी त्यांना बढती मिळाली असून ते उप अभियंता या पदावर रुजू झाले आहेत. त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे, मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सतीश पाटील, डी.आर. कदम, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पाटील, बलराज रणदिवे, रोहित पडवळ, कार्याध्यक्ष विजय पवार, आकाश मुंडे, घाडगे, क्रीडाईचे अध्यक्ष शाम नाईकनवरे, गोरक्ष मोहिते यांच्यासह मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.