धाराशिव (प्रतिनिधी) - महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था म धाराशिव या पतसंस्थे ची 35 व्या आदी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत गणपतराव साखरे यांच्या अध्यक्षतेखाली दि 1/9/2024 रोजी बालाजी मंदिर मराठी गल्ली धाराशिव येथे उत्साहात संपन्न झाली. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शुभेच्छा कामकाजास सुरुवात करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत साखरे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. त्यांनी सभासद भाग भांडवल गंगाजळी व इतर निधी तसेच ठेवी मध्ये दरवर्षी समाधानकारक वाढ होत असल्याचे सांगून संस्थेचे भाग भांडवल 2,28,39400/- राखीव व इतर निधी 3,40,89533/-ठेवी 34,18,65148/- गुंतवणूक 17,27,21000/- कर्जे 23,96,06242/- खेळते भांडवल 42,99,66320/- इतके असून संस्थेला सर्व तरतुदी वजा जाता 53,36,685/- नफा झाला असल्याचे सांगितले. तसेच संस्था धाराशिव शहर व तालुक्यातील पतसंस्थेचे सभासद असणारे व्यवसायिक, शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात देण्याचे मोलाचे कार्य गेली 35 वर्षापासून करीत असल्याचे सांगितले. संस्थेच्या सभासदांना 9% प्रमाणे लाभांश जाहीर केला सभेत ज्येष्ठ सभासदांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सभेत मधुकर जाधव जिल्हा सहकार विकास अधिकारी यांनी कर्जवाटप, कर्ज वसुली  व संस्थेने करावयाची गुंतवणूक इ बाबत बहुमोल असे मार्गदर्शन केले. सभेसाठी उपस्थित असलेले ॲड. रवींद्र कदम बार असोसिएशन जिल्हा न्यायालय धाराशिवचे माजी अध्यक्ष, पी. एन. चव्हाण माजी प्राचार्य छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव यांनी ही संस्थेविषयी आपले मनोगत व्यक्त केले

सभेस शेषराव जगताप, नवनाथ राऊत, सुधाकर झोरी, संतोष आडवाणी, ॲड. काजळे तसेच संस्थेचे सभासद बहुसंख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन व्यवस्थापक नवनाथ बचाटे व आभार हनुमंत महाळंगकर यांनी केले. सभेचे कामकाज पार पाडण्यासाठी संस्थेचे कर्मचारी दीपक देवकते, श्रीमती सुलक्षणा माने,योगेश भोसले,स्वप्निल आहेर, ओंकार जगताप, श्याम साखरे, संक्षेप ठेव प्रतिनिधी जितेंद्र झाडे, चंद्रकांत इंगळे, हरिभाऊ उंबरे, महेंद्र उंबरे, बालाजी सूर्यवंशी, नितीन जामगे, श्रीधर पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.


 
Top