धाराशिव (प्रतिनिधी)- मागील काही दिवसापासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू असून जिल्ह्यातील 16 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान होत असून अनेक ठिकाणी पिकात पाणी साठले आहे. स्थायी आदेशप्रमाणे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचित केले असून त्यांनी संबंधितांना पंचनामे करण्याचे आदेशीत केले असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
झालेल्या नुकसानीचे तलाठी यांच्याकडून पंचनामे करून घ्यावेत. सततच्या पावसाने नदी - नाले तुडुंब वाहत असून अनेक पूलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, काळजी घ्यावी. नदी काठच्या गावांनी विशेष काळजी घेण्याचे तसेच तात्काळ प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीने 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र/राज्य आपत्ती निवारण निकषाप्रमाणे अनुदानाची तरतूद असून सदरील रक्कम लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, त्यांनी पीक नुकसानीच्या सुचना 72 तासाच्या आत देणे गरजेचे आहे. त्यामुळे नुकसानीची पूर्वसूचना देवून वस्तुनिष्ठ पंचनामे करून घ्यावेत व पडताळणी करूनच पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे