तेर (प्रतिनिधी)-ब्युरो व्हेरीटास यांच्या सौजन्याने आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या सहकार्याने 31 ऑगस्टला धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात स्कूल किटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ढोकी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अंबादास मोरे उपस्थित होते. अध्यक्षपदी महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के. बेदरे होते. यावेळी पर्यवेक्षक सुशीलकुमार पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अविनाश पाडुळे, नरहरी बडवे, चंद्रकांत कोळेकर, अनिल टेळे यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पाचवी ते नववी वर्गातील 70 विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.यू.गोडगे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बी.डी.कांबळे यांनी केले.