तुळजापुर (प्रतिनिधी)- येथील नगर परिषद पाठीमगील भाजी मंडई साठी आरक्षित जागेवरिल अनाधिकृत अतिक्रमण बांधकाम होवू देवू नये. अन्यथा नियमाचा अधीन राहुन न्याय व्यवस्थेकडे दाद मागितली जाईल. असे निवेदन जिल्हाधिकारी यांना माजी नगरसेवक नागनाथ भांजी देवुन केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदची खुली जागा न.प. कार्यालयाच्या पाठीमागे आहे. दि. 27 सप्टेंबर 2014 जागा रिकामी (मोकळी) असून या जागेवरती मोठी झाडे होती. परंतु गेली आठवड्या पासून सदरील जागेवरील झाडे तोडण्याचा सपाटा चालू असून चौकशी अंती असे समजले कि या जागेवरती पक्के बांधकाम करणार आहेत. म्हणजेच न.प.च्या जागेवरती कायम स्वरूपी अतिक्रमण होत आहे. सदरील वृक्ष (झाडे) तोडबाबत न.प. देण्यात आला तरी ही वृक्ष तोड होतच आहे व पक्के बांधकामाचे प्रयत्न चालु आहेत. सदरील जागा न.प. नियमानुसार अधीनियमातील तरतुदी नुसार दि. 24-11-78 रोजी ताब्यात घेतलली आहे. सदरील मालकी जागे बाबत सोबत 40 पानाची संचिका जोडलेली आहे. त्याचे अवलोकन व्हावे हि विनंती व सदरील जागेवरील अनाधिकृत अतिक्रमण व बांधकाम होऊ देऊ नये, नसता नियमा नुसार न्याय व्यवस्थेकडे संबधीत व त्यांना सहकार्य करणार विरुद्ध दाद मागितली जाईल असे म्हटलं आहे.