धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक २८ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर या कालावधीत वडोदरा , गुजरात येथे होणाऱ्या  किशोरी , मुली, महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव या ठिकाणी महाराष्ट्र खो खो संघाच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व खेळाडू सहभागी झाले होते. त्यामधून राष्ट्रीय खेलो इंडिया खो खो लीग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा महिला तिन्ही संघ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी जाहीर केले.  

 यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे शिक्षण घेत असलेल्या अश्विनी शिंदे , तन्वी भोसले, सुहानी धोत्रे ,मैथिली पवार ,संध्या सुरवसे यांची ज्युनियर संघात ,आरोही पाटील हिची किशोरी संघात तर ऋतुजा खरे ,संपदा मोरे ,अमृता माने ,शिवानी येड्रावकर यांची महिला महाराष्ट्र खो-खो संघात निवड झाली आहे अभिनंदनीय बाब म्हणजे कु.संध्या सुरवसे हिची महाराष्ट्र संघाच्या कर्णधार पदी निवड झाली आहे.

 वरील निवड झालेल्या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक  प्रवीण बागल , प्रभाकर काळे ,अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

 या निवडीबद्दल आदर्श शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधीर  पाटील, महाराष्ट्र खो खो संघटनेचे सचिव चंद्रजीत जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी  आदित्य भैया पाटील ,प्रदीप घोणे, अभय इंगळे यांनी अभिनंदन केले


 
Top