तुळजापूर  (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरचा नव्याने लोगो डिझाईन तयार करण्याची प्रक्रिया सुरु असुन आजपर्यंत जवळपास पंचेचाळीस लोगो प्राप्त आहेत. सदरील प्राप्त लोगो  श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त तथा तहसिलदार अरविंद बोळंगे प्रमुख उपस्थितीत  महंत ,  पुजारी मंडळ पदाधिकारी तसेच स्थानिक कलाकार यांना दाखवण्यात येवुन यातुन एक ते पाच नंबर देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नंतर हे लोगो श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वेबसाईट वर टाकण्यात येणार आहेत. येथे ज्या लोगोला सर्वाधिक पसंती मिळणार आहे त्यांना बक्षिसे देण्यात येणार आहे. लोगो सादर करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2024 आहे.

श्रीतुळजाभवानी मंदीर लोगोसाठी या क्षेत्रातील तज्ञ, जाणकार, स्वारस्य असणाऱ्यांनी लोगो तयार करण्यासंबंधीचे आकर्षक डिझाईनचे सादरीकरण श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कार्यालयात दिनांक 23/09/2024 पर्यंत सादर करावे असे आवाहन  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूर यांनी केले होते. श्री तुळजाभवानी मंदिराचा लोगो हा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचा आहे हे सहजरित्या समजणे आवश्यक आहे.

लोगो आकर्षक असावा.  लोगोच्या रंगसंगतीमध्ये सुबकता असावी. लोगो कमीत कमी जागेतही स्पष्ट व आकर्षक दिसावा. लोगोत इतर कोणत्याही लोगोशी साधर्म्य व सुसंगत नसावा. श्री तुळजाभवानी मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक, पारंपारीक रुढी, विधींचा अभ्यास करून लोगोचे आकर्षक असे डिझाईन सादर करावे.

 श्री तुळजाभवानी मंदिराची व्यापक प्रसिध्दी व इतर व्यवस्थाबाबत  उपरोक्त बाबीसाठी टेक्नॉलॉजीबाबत प्रस्ताव सादर करावेत. अ व ब चे कामासाठी प्रोत्साहनपर बक्षिसे मंदिरमार्फत देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट बक्षीस - 03 लाख असणार आहे. इतर प्रोत्साहनपर बक्षीस दोन 01 लाख प्रत्येकी असणार आहेत. उपरोक्त सर्व बाबी तसेच इतर अनुषंगीक बाबी लक्षात घेऊन आपले आकर्षक डिझाईनचे सादरीकरण करावे तसेच श्री तुळजाभवानी मंदिराची व्यापक प्रसिध्दी व इतर व्यवस्थाबाबत टेक्नॉलॉजीबाबत सविस्तरपणे प्रस्ताव सादर करावा. अधिक माहितीसाठी इमेल आय. डी shreetuljabhvanitemple@ gmail.com <mailto:shreetuljabhvanitemple@gmail.com> वर संपर्क करावा. संपर्कासाठी क्रमांक चव्हाण ए. बी. 9403396131 हा असल्याची माहीती  जिल्हाधिकारी धाराशिव तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर, जि. धाराशिव  यांनी केले आहे.

 
Top