भूम  (प्रतिनिधी)-  भूम तालुक्यात रात्री झालेल्या पावसाने शेतकऱ्याच्या खाणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर चिंचपूरला येथील बाणगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे शेतकरी करण्यासाठीचा मार्ग बंद झाला आहे.

भूम तालुक्यात सर्वच ग्रामीण भागात सध्या सोयाबीन काढणी जोरात चालू असून दोन दिवसापासून पावसाने जोर  धरल्याने काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. भूम तालुक्यात खरीप हंगामात यावर्षी 46 हजार 527 सेक्टर क्षेत्रावरील पिके पावसामुळे धोक्यात आले आहे. सतत पडणारे पावसामुळे पिके काढताना अडचणी येत असून नुकसान होत आहे. यावर्षी पाऊस वेळेत दाखल झाल्याने 46 हजार 527 हेक्टर वर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली होती .पावसाचे पाणी पिकात  साचल्याने  काढून टाकलेल्या सोयाबीन डागील होत असून खराब होत आहे. तालुक्यातील बहुतांश मंडळात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पहिलेच पिके पिवळी पडली होती. जेवढे आलेले पीक शेतकऱ्याच्या पदरात पडून घेण्यात शेतकरी प्रयत्न करत असताना दोन दिवसापासून पडत असणाऱ्या पावसाने शेतकऱ्याचे जास्तीचे नुकसान झाले आहे. यावर्षी वेळेत पेरण्या झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांमधून आर्थिक उत्पन्न होईल. अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु दोन दिवसापासून पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

 
Top