भूम (प्रतिनिधी)-  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी धाराशिव येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत श्री गुरुदेव दत्त हायस्कूल ने द्वितीय क्रमांक पटकावला. या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेतून आपल्या शाळेचा विद्यार्थी कुमार स्मित श्याम होळकर याची विभाग स्तरावर निवड झाली आहे. तो विभागीय स्पर्धेमध्ये खेळणार आहे.

सर्व विजयी  खेळाडूंचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष विजय  मोटे, सचिव व पर्यवेक्षक सतीशराव देशमुख, कोषाध्यक्ष अशोकराव मस्कर, शाळेचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अंजना घुले, क्रीडा शिक्षक जयंतराव शिंदे, आप्पा मिसाळ व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी विजयी खेळाडूंचा सत्कार केला. यामध्ये सहभागी खेळाडूंची नावे स्मित होळकर (कर्णधार) प्रीतम शिंदे, यश मोरे, श्रेयस आसलकर, पार्थ धावारे, हर्षदीप धावारे, महेश वनवे, श्लोक उपरे, (विकेटकीपर) प्रेम फिसके, आसिफ सापवाले व ध्रुव मारे यांचा समावेश आहे.

 
Top