धाराशिव (प्रतिनिधी)- दि.15 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यामध्ये भारताचे उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांच्या हस्ते मुंबई येथुन ऑनलाईन पद्धतीने संविधान मंदिर/भवनचे उद्घाटन करण्यात आले. धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे देखील संविधान मंदिर /भवनाचे उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. 

या सोहळ्याला मतदार जनजागरण समिती धाराशिवला देखील निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करण्यात आले व भारतीय संविधान उद्देशिकातील विश्लेषणाचे पत्रक वाटप करुन सध्या भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्ष चालु आहे. या वर्षांमध्ये मतदार जनजागरण समितीच्या वतीने महिन्याच्या दर 26 तारखेला समितीच्या वतीने भारतीय संविधान वरती व्याख्यान व इतर कार्यक्रमातुन जनजागृती करण्यात येत आहे. भारतीय संविधान आपणाला जगायला शिकवते भारतीय संविधान हे जगातील सर्वात अतिशय सुंदर व भक्कम असे न्याय देणारे संविधान आहे, असे मनोगत मांडले. संस्थेच्या वतीने मतदार जनजागरण समितीच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत शाल, डायरी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा समितीचे उपाध्यक्ष गणेश वाघमारे, शेख रऊफ, बाबासाहेब गुळीग, प्रदिप पांढरे, बलभीम कांबळे, संतोष जाधवर, संविधान वक्ते रवि सुरवसे तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. एस. बिरादार, बालाजी वाघमारे, औद्योगिक क्षेत्रातील नामवंत वेणु स्टाईल तथा आयएमसी ऑफ आयटीआयचे चेअरमन संजय देशमाने, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रविण औताडे, चर्मकार संघटनेचे नितीन शेरखाने, बबन वाघमारे, ॲड,गणपती कांबळे, शेरखाने, पी. एस. गाडेकर, एफ. बी. जगताप, व्ही. एम. धनशेटृटी, रविंद्र जगदाळे, एस. एन. ओव्हाळ, डी. जी. गुडे, जी. व्ही. कुलकर्णी, के. डी. नाईक, आर. डी. येरकळ, ए. डी. सुरवसे, एम. ए. चौधरी, के. आर. जुबेरी, पुनम, श्रृतिका यादव, दिनेश इंगळे, पांडुरंग भोकरे, माधव टेकाळे, किरण झरकर, एस. व्ही. शिंदे, एच. डी. बोर्डे सह विद्यार्थी, पालक व इतर उपस्थित होते.

 
Top