तुळजापूर (प्रतिनिधी)-माजी मंत्री मधूकरराव चव्हाण यांच्या सुचनेनुसार युवा नेते ऋषिकेश मगर यांच्या नेतृत्वात तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयास शिस्टमंडळाने (दि.4) रोजी भेट दिली.

येथील रुग्णालय हे तीर्थ क्षेत्र तुळजापूर ठिकाणी असल्याने तालुक्यासह श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी इतर राज्यातून भाविक भक्त दाखल होतात. त्यांच्याही आरोग्याच्या समस्या असतात. ते उपचार घेण्यासाठी ह्या रुग्णालयावर अवलंबून आहेत. त्यामुळे साहजिकच रुग्णांची संख्या अधिक असल्याने येथील रुग्णांच्या आवश्यक असलेल्या सोयी - सुविधा बाबत सतर्कता हवी आहे. अशा काही विषयाच्या अनुषंगाने ऋषिकेश मगर यांना सूचना दिल्या.  ह्या निमित्ताने येथील संबंधित वैद्यकीय अधिक्षक, डॉकटर, कर्मचारी यांचेशी चर्चा करुन रुग्णालय अंतर्गत आवश्यक बाबींची पाहाणी केली असता येथील इमारत तसेच महत्वाचे साहित्य सुधारीत करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आले आहे.

दुसरे म्हणजे आपसिंगा येथील डेंगूचा एक रुग्ण येथे उपचार घेत आहे.सदरील रुग्णावर योग्य उपचार सुरु आहेत. सोबतच इतरही रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचेशी शिस्टमंडळाने संवाद साधला. एकंदरीत रुग्णालय अधिकरी व कर्मचारी हे रुग्णांची योग्य सेवा देत आहेत.रुग्णालय व परिसर स्वच्छता असल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी युवा नेते ऋषिकेश  मगर,पंचायत समिती तुळजापूरचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, रसिक वाले, धनु मगर, दिपक थोरात, आपसिंगा येथील माजी उपसरपंच दिपक सोनवणे, शिवाजी शिदे आदी उपस्थित होते.

 
Top