तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी मंदीर विकास कामांचा शुभारंभ नवरात्रोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. सध्या विकास आराखडा पालकमंत्र्यांकडे सादर केला आहे. नंतर तो समितीकडे जावुन तेथुन तो मुख्यमंत्री यांच्याकडे मंजुरीस जाणार असल्याची माहिती दिली.

 मंदीर अंतर्गत भागाला तेराव्या शतकातील रुप आणण्यासाठी आम्ही मुर्ती व गाभारास हात न लावता विकास कामे करणार असल्याची माहिती  श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

यावेळी पञकारांशी संवाद साधताना डॉ. सचिन ओंम्बासे म्हणाले कि, श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अंतर्गत मंदीर परिसरातील विविध विकासात्मक कामे पुरातत्व विभागाकडुन केलेजाणार आहे. हे कामे पाच टप्यात करण्यात येणार असुन यासाठी मंदीर ट्रस्ट निधीतुन 56 कोटी रुपये निधी कामांसाठी देण्यात  येणार आहे. येत्या पंधरा दिवसात वर्क आँर्डर देण्याबाबतीत नियोजन असल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मंदीर तेराव्या शतकातील हेमाडपंथी असुन, हे मंदीर भाविकांच्या वाढत्या संखेच्या पार्श्वभूमीवर सध्या अपुरे पडत आहे. श्रीतुळजाभवानी मुर्ती व गर्भगृहाला हात न लावता पुढील पाचशे वर्षचा विचार करुन मंदीर परिसर जागा दुप्पट उपलब्ध करुन घेवुन मंदीर परिसरात विकास कामे करण्यात येणार आहेत. हे कामे करण्यासाठी तीन ते चार वर्ष लागण्याची शक्यता आहे. मुख्य गृभगृह वगळता सिंह गाभारा सहा इंच खाली घेतला जाणार आहे. तसेच चोपदार दरवाजा जवळील ऐक्झिट फँन व पलंग खोली येथुन बाहेर पडण्याचा मार्ग केला जाणार आहे.


महंत तुकोजीबुवा यांनी दिली जागा 

भवानीशंकर  समोरील  परिसरातील ओवा-या तसेच मंदीरातील गणेश ओवरीच्या बाजु ते शिवाजी दरवाजा पर्यत भाग पाडून त्याचा वापर मोकळी जागेसाठी केला आहे. यासाठी व उंबरझरा येथील जागा देण्यास महंत तुकोजीबुवा यांनी समती दिल्याबद्दल आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो. तसेच श्री तुळजाभवानी मंदीरात प्रवेश हा तीन महाध्दार मधुन देण्यात येणार असुन भाविक श्रीकल्लोळ गोमुख तिर्थकुडात स्नान करुन  हातपाय धुवुन तो दर्शन मंडपात जावू शकणार आहे. हे काम अवघड व जोखीमीचे आहे. यासाठी अंदाजे अठराशे कोठी रुपये खर्च येणार आहे.

दर्शन मंडप उंबरझरा येथे उभारला जाणार असुन तो वीस हजार क्षमतेचा असणार आहे. येथील जागा खचु नये म्हणून संबंधित विभागाला जागा तपासणी आदेश दिले जाणार आहेत. तसेच ज्यांच्या जागा संपादीत केल्या जाणार आहेत त्यांना समाधान पर्याय किंवा चारपट मावेजा देण्याबाबतीत विचार केला जाणार आहे.

हाडको घाटशिळ रोड येथे भाविकांना थांबण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. तसेच रामदरा तलावात स्ट्युच उभारला जाणार असुन पाचुंदा तलाव परिसरात दोनशे एकर मध्ये विकास कामे केले जाणार आहेत. यावेळी विश्वस्त तथा उपविभगीय अधिकारी संजय ढवळे, तहसिलदार अरविंद बोळंगे, प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार माया माने, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, पीआरओ गणेश मोटे आदी यावेळी उपस्थितीत होते.

 
Top