धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विविध प्रश्न लोकसभेत अभ्यास पूर्ण मांडणी करणारे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची लोकसभेच्या स्टँडिंग कमिटीवर पंचायत राज व ग्रामविकास कमिटीवरती यांची सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल कौतुक केले जात आहे.

लोकसभेच्या कामकाजाचा भाग म्हणून लोकसभेकडून विविध स्टँडिंग कमिटीचे अध्यक्ष आणि सदस्यांची निवड करण्यात येत असते. धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे. त्यांच्या लोकसभेच्या निवडीनंतर पंचायत राज व ग्रामविकास कमिटीवरती त्यांचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना प्राप्त झाले आहे. तसेच याचे वृत्त लोकसभेच्या बुलेटिन मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. अभ्यासपूर्ण भाषणे व लोकसभेच्या कामकाजाचा अनुभव या सर्व गोष्टींचा फायदा लोकसभेच्या पंचायत राज व ग्रामविकास कमिटीला होणार असून मतदारसंघांमध्ये खासदारांच्या स्टँडिंग कमिटी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनचा वर्षाव सुरू आहे.

 
Top