उमरगा (प्रतिनिधी)- तालुक्यातील कराळी गावात जुन्या गावठाण रोहित्रावर अतिरिक्त भार येऊन गावात नेहमी वीजपुरवठा खंडित होत होता. विजेची वाढती गरज पाहता या गावासाठी नवीन विद्युत वितरण मंजूर करण्याची मागणी ग्रामस्थांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे केली होती. 

या अनुषंगाने आमदार ज्ञानराज चौगुले यांनी जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत कराळी येथे नवीन 100 के.व्ही.ए. क्षमतेचे विद्युत रोहीत्रासाठी निधी उपलब्ध करू दिला आहे. शुक्रवार दि.27 रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत नवीन विद्युत रोहीत्र कार्यान्वित करण्यात आले. गावचा विजेचा मोठा प्रश्न सोडवल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे आभार व्यक्त केले. यावेळी लाईनमन सातय्या स्वामी, संदीप पवार, सरपंच सुभाष राठोड, दादाराव वडदरे, देविदास मुळे, रवी वडदरे, मारुती वडदरे, शिवाजी वडदरे, अजय जमादार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top