भूम (प्रतिनिधी)-आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष 2 रे “ या उपक्रमाअंतर्गत पंढरपुरच्या आषाढीवारीत या वर्षी 15 लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांची रुग्णसेवा यशस्वीरीत्या पार पाडल्याने आरोग्यमंत्री व पालकमंत्री तानाजी सावंत यांना इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसने नोंद घेऊन पुरस्कार दिल्याने त्यांचा माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी पुणे येथील कार्यालयात जाऊन सत्कार केला आहे. 

सदरील पुरस्कार सावंत याना 15 लाखांहून अधिक वारकऱ्यांच्या तपासणीची जबाबदारी यशस्वी रित्या पार पडल्याने. वारकऱ्यांची अनेक अजारावर मात केली यामुळे आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी या संकल्पनेतून डॉ. तानाजीराव सावंत यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळे पंढरपुरच्या वारीला एक नवी ओळख मिळाली आहे. त्यांचे कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे, ज्यामुळे शकडो वारकऱ्यांचे जीव वाचले आणि लाखो वारकऱ्यांना तात्काळ उपचार मिळाले. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आरोग्य विभागाचे व आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांचा सत्कार माझी नगर अध्यक्ष संजय गाढवे यांनी सत्कार केला आहे.




 
Top