परंडा (प्रतिनिधी) - परांडा शहरामध्ये कीटक शास्त्रीय, ताप, साथरोग आजार सर्वक्षण व प्रतिबंधत्मक उपाययोजना व औषधोपचार मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक  यांच्या आदेशानुसार्‌‍ व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि.10 रोजी पासून सुरू करण्यात आलेली आहे. 

एकूण 4 टीम परांडा शहरातील कुटुंबाला भेट देऊन कोरडा दिवस पाळणे, डेंगू, मलेरिया या आजारांबद्दल माहिती देणे, लक्षणे असतील  तर  रक्त तपासणीसाठी शासकीय रुग्णालय परांडा येथे संदर्भित करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.    

प्रत्येक टीम रोज 50 घरे तपासणार आहेत. ताप, संडास, उलटी चे रुग्ण असतील तर रक्त नमुने तपासणी करणार आहेत. घरामधील पाणी साठवणी कंटेनर मध्ये डास अंडी घालतात व अंडी पासून डासाच्या अळ्या निर्माण होतात. असे असतील तर अबॅटिंग करतील. कंटेनर रिकामे करण्यात येतील. ही मोहीम 15 दिवस चालणार आहे . परांडा शहरातील सर्व घरांचे सर्वेक्षण करण्यात येईल. सर्व नागरिक यांना विनंती आहे की टीमला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन उप जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top