भूम  (प्रतिनिधी)- बँक ऑफ महाराष्ट्र सोलापूर झोन आणि मध्य रेल्वे, सोलापूर विभागातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक  यांच्यात वेतन खाती सुविधेसाठी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना विशेष बँकिंग सेवा आणि आकर्षक फायदे उपलब्ध होणार आहेत.

या कराराअंतर्गत, रेल्वे कर्मचाऱ्यांना शून्य शिल्लक खाते, कर्जांवर सवलतीच्या व्याजदर, डिजिटल बँकिंग सेवा आणि विमा तसेच गुंतवणूक पर्यायांचा लाभ मिळणार आहे. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजीव कुमार आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक  नीरज कुमार डोहरे यांनी या करारावर सह्या केल्या आहेत.त्यांनी या संधीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.आणि रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम बँकिंग सेवा पुरविण्याची वचनबद्धता व्यक्त केली. यावेळी बँकचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

 
Top