उमरगा (प्रतिनिधी)- श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाने गेल्या चाळीस वर्षाच्या कालावधी दरम्यान सर्व जाती धर्माच्या माणसांना समान न्याय देऊन राष्ट्रीय एकात्मतेची जपणूक केली. शिक्षणा सारख्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे या साठी भाग्य लाभते. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली त्या मुळे मी भाग्यवान आहे. असे स्पष्ट करून बदलत्या गतीमान काळा प्रमाणे शिक्षण संस्थांच्या समोर मोठी आव्हानेउभी रहात आहेत. या अव्हानांचा सामना करून शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करावी लागणार आहे. शिक्षण संस्था या मंदिरा सारख्या पवित्र असतात. शिक्षकांनी शिक्षण संस्थांचे पावित्र्याची जपणूक करावी, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा बसवराज पाटील यांनी केले.
श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ऋणनिर्देश सोहळ्याचे उद्घाटक म्हणून पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष विनायकराव पाटील होते. वीरशैव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. मल्लीनाथ मलंग , श्रमजीवी शिक्षण संस्थेचे संचालक भाऊराव सोमवंशी, मल्लीनाथ दंडगे, व्यकंटराव जाधव, शब्बीर जमादार, विठ्ठलसाई साखर कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव , शरणाप्पा पत्रिके , गोविंद सुर्यवंशी आदि सह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी राज्यमंत्री बसवराज पाटील म्हणाले कि- राजकारणातून आम्हाला शिक्षण क्षेत्राची आवड निर्माण झाली. आपल्या हातून समाजा करिता चांगले कांही देण्याच्या हेतून श्रमजीवीची उभारणी काण्यात आली. गेल्या चाळीस वर्षाच्या कालावधी दरम्यान श्रमजीवी च्या माध्यमातून विविध क्षेत्रात हजारो विद्यार्थ्यांनी आपला नावनौलिक केला आहे. शिक्षण क्षेत्र हे सुसंस्कारित पिढया घडविण्याचे पवित्र क्षेत्र आहे. ध्येयवेडे झाल्या शिवाय शिक्षण क्षेत्राचा विकास शक्य नाही. ध्येयवेडे होऊन शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षकांनी उत्कृष्ट व सुसंस्कारित पिठया घडवाव्यात अशी अपेक्षा पाटील यांनी केली.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी विनायकराव पाटील म्हणाले कि- श्रमजीवी शिक्षण संस्थेने अनेक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून शिक्षण क्षेत्रात आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा मानबिंदू अखंडीत ठेवला आहे. श्रमजीवी शिक्षण संस्थेत सर्व जातीधर्माचे बांधव गुण्यागोविंदाने नांदत असल्या मुळे श्रमजीवीच्या रूपाने राष्ट्रीय एकात्मतेची इमारत उभी केली आहे. अधुनिक तंत्रज्ञानाच्या जमान्यात शिक्षकांनी अधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण आत्मसात करून गुणवंत विद्यार्थी घडवावेत. संस्था अमर असतात . श्रमजीवी च्या आदर्शाची परंपरा कायम रहावी अशी अपेक्षा पाटील यांनी केली.
या वेळी श्रमजीवी च्या विविध विद्या शाखांतील प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या शैक्षणिक कार्या बद्दल सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दिलीप गरुड यांनी केले. सुत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. सुरेश कुलकर्णी यांनी केले. प्राचार्य डॉ . श्रीराम पेठकर , प्राचार्य भीमाशंकर सारणे , प्राचार्य डॉ. प्रवीणकुमार मुख्याध्यापक धनाजी खोंडे, मुख्याध्यापक व्यकंट घोडके ,मुख्याध्यापक शिवराज औसेकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. आभार प्राचार्य सैपन शेख यांनी मानले.