भूम (प्रतिनिधी)- बँक ऑफ महाराष्ट्र क्षेत्रीय प्रबंधक संजीव कुमार, नोडल ऑफिसर वैभव घाडगे, बिडीओ दीपक आदटराव, आबा भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली  ईट येथील शाखा व्यवस्थापक दीपक गवळी यांचे शेतकऱ्यांसाठी अतिक्षय उत्कृष्ट काम सद्या सुरु आहे. बँक आपल्या दारी हा स्तुत्य उपक्रम बँकेने हाती घेतला आहे. बँकेच्या बँक कृषी कर्ज मिञाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन पीककर्ज वाटप करण्याची मोहिम बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ईट ने हाती घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

याशाखे अंतर्गत ईट, डोकेवाडी, नागेवाडी,घाटनांदुर, ईराचीवाडी, माञेवाडी, आंद्रुड, लांजेश्वर, निपाणी, माळेवाडी, पांढरेवाडी, पखरुड, जोतीबाचीवाडी, वडाचीवाची, घुलेवाडी, दांडेगांव, ञिंञज जवळ जवळ बावीस गांवे या बँकेला दत्तक आहेत. या आर्थिक वर्षात आता पर्यंत 90 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. या वर्षी पिक कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेत फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासली नाही. शेतकऱ्यांनी पीककर्ज फाईल कागदपञे यांची झेरॉक्स प्रत बँकेने जमा करुन घेतली .त्यानंतर कागदपञाची तपासणी करुन क्षेत्रीय कार्यालय सोलापूर या ठिकाणी पाठवून त्या फाईला मंजुरी मिळवून दिली आहे.पीककर्ज मंजुरीची यादी  बँक कृषी कर्ज मिञा मार्फत शेतकऱ्यांना पोहचवली जात आहे. पीक कर्ज मंजूर झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला जात आहे.आणि ञुटीतील फाईल दुरुस्त करुन बँकेत जमा केल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना बँकेमध्ये जायचा ञास कमी होऊ लागला आहे.आता पर्यंत जवळ जवळ 90 शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळाले असुन उर्वरित ञुटीतील फाईली ची यादी पुढील दोन आठवड्यात लागणार आहे. नवीन पीक कर्ज मंजूर यादी पंधरा दिवसात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.या शाखेतील शाखा व्यवस्थापक दीपक गवळी, कृषी अधिकारी आबासाहेब भागवत, उपशाखा व्यवस्थापक हरिकृष्ण पाला, योगेश शर्मा, जितू पवार, अशितोष गायकवाड, अंकित कुमार ने आदी परीश्रम घेतले आहे. या कार्यक्रम प्रसंगी ईट चे सरपंच संजय आसलकर, ग्रामपंचायत गट नेते सयाजी हुंबे, शाखा व्यवस्थापक दीपक गवळी, रामराजे देशमुख,योगेश चव्हाण, दत्ता बोंदार्डे , महावीर जालन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रंचालन महावीर जा यांनी केले तर आभार आबासाहेब भागवत यांनी मानले.


“ आज रोजी 90 शेतकऱ्यांचे पीक कर्ज मंजुर झाले असून अंदाजे एक कोटी 45 लाख रुपये पीक कर्ज रक्कम मंजूर आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे पीक कर्ज पंधरा दिवसात मार्गी लागणार आहेत. ग्रामीण भागातील खातेदारांनी खात्यावरील पैसे पाहण्यासाठी बँकेमध्ये येण्याची आवश्यकता नाही त्यासाठी 9833335555 या नंबर वर मिसकॉल द्यावा.

दिपक गवळी 

शाखा व्यवस्थापक, ईट.

 
Top