धाराशिव (प्रतिनिधी)-आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि एनसीआयएसएम व एन सी एच कॉन्सीलद्वारे बीएएमएस,बिएचएमएस बीयुएमएस आयुष विद्यार्थ्यांना कुठलिही पूर्वकल्पना न देता 20 डिसेंबर 2023 व 29 नोव्हेंबर 2023पासून 

अचानक नेक्स्ट राष्ट्रीय निर्गमण चाचणी परीक्षा लागू करण्याचे जाहिर करण्यात आले. त्यानूसार 20 डिसेंबर 2023 29 नोव्हेंबर 2023 च्या नंतर जे विद्यार्थी इंटर्नशीप करणार आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आली.ही परिक्षा पात्र झाल्याशिवाय वैद्यकीय परवाना दिला जाणार नव्हते महाराष्ट्रातून विद्यार्थी प्रतिनिधी डॉ ज्ञानेश्वर शिंदे यांनी या लढ्याचे नेतृत्व केलं आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना न्याय मिळाला यांच्या माध्यमातून एक नेतृत्व गुण विकास करत असताना देशपातळीवरील युवक आज नेतृत्व करते ही अभिमानाची गोष्ट आहे.देशभरात मागील नऊ 9 महिन्यांपासून आयुष विद्यार्थ्यांनी या परिक्षे चा विरोध केला आहे.वैद्यकिय विद्यार्थी असंख्य आंदोलन केली.अनेक मंत्री खासदार, आमदार या संदर्भात विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार केंद्रीय आयुषमंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांनी या परिक्षेसंदर्भात कमिटी स्थापन करुन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला. काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय आयुषमंत्री मा.ना.प्रतापराव जाधव साहेब यांनी सदरील नेक्स्ट परिक्षा 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून लागु करण्यात आली आहे असे जाहीर केले.

विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय आयुषमंत्री मा.ना.प्रतापरावजी जाधव यांचे या लढ्यात महाराष्ट्रातुन सक्रिय असलेले वैद्यकीय विद्यार्थी डॉ मंगेश भस्के,डॉ.सुमित चांदणे, डॉ ज्ञानेश्वर शिंदे , यांनी आभार व्यक्त केले

 
Top