भूम (प्रतिनिधी)- पाणी प्रश्नावरून श्रेय लाटणाऱ्यांनी दिल्लीच्या पाठपुराव्याच्या चार ओळीचा पुरावा दाखवावा मग श्रेय घ्यावे. अन हिम्मत असेल तर आणखी 7 टीएमसी पाणी आणून दाखवावे. त्यांचे आम्ही जाहीरपणे कौतुक करून राजकीय संन्यास घ्यायला तयार आहोत असे खुले आवाहन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी भूम येथिल सत्कार प्रसंगी बोलताना विरोधकांना केले.
शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात विधान परिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधान परिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल भूम तालुका भाजपाच्यावतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार सूजितसिंह ठाकूर यांनी आपल्या आयुष्यातील भाजप चळवळतील आठवणी सांगताना त्यांनी प्रवास वर्णन केलं . विधान परिषद आमदारकीची संधी मिळाली त्या आमदारकीचा सर्व उपयोग जिल्ह्याच्या मातीसाठी केला, परंडा मतदार संघातील जिव्हाळ्याचा विरोधकांच्या दुर्लक्षितपणामुळे कृष्णा मराठवाडा सिना कोळेगाव फाईल बंद झालेला प्रश्न पुन्हा हाती घेतला , त्याचा अभ्यास केला , सत्तेतील संबंधित मंत्र्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
कृष्णा मराठवाडा सिना कोळेगाव 21 टी एम सी पाण्या संदर्भात पाठपूरावा सुरू केला. यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने हेलपाटे घालून अत्यावश्यक असलेली केंद्रातील पर्यावरण विभागाची परवानगी मिळवली. पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळवले. आर्थिक तरतूद करून घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळवली. संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. तेव्हा कोठे सात टी एम सी पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला. आज मात्र याच श्रेय घेण्यासाठी लढाया सुरू झाल्या आहेत. चढाओढ सुरू झाली आहे.
श्रेय घेणाऱ्यांनी हिम्मत असेल तर आणखी सात टीएमसी पाणी मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा. त्यांच्या कार्याला यश आलं तर आम्ही त्यांचं जाहीरपणे स्वागत करू एवढेच नव्हे तर आम्ही राजकीय संन्यास देखील घेऊ असेही जाहीरपणे आवाहन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी बोलताना केले.
विरोधकांच्या दुर्लक्षितपणामुळे सीना कोळेगाव प्रकरणाची फाईल पूर्णपणे बंद झाली होती, उलट अगोदर विहीर खोदण्यापूर्वी पाट खोदायच केले होते, असा उलटा प्रकार विरोधकांनी केला होता, एवढे करूनही कसल्याही प्रकारच्या पाण्याच्या पाठपुराव्या शिवाय अनेक वर्ष पाणी प्रश्नाचं राजकारण करून मतदारांची दिशा भूल केली होती . 60 टक्के बोगद्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मार्गी लागले असल्याची आठवण करून दिली.
इतर पक्षाच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्यांना संधी दिली जाते. या पक्षात नवयुवक - युवतींना काम करण्यासाठी मोठा वाव आहे. युवक - युवतीचा कल भाजपकडेच आहे. प्रत्येकाच्या कार्याची विशेष दखल घेतली जाते याची प्रचिती परंडा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी करून दिली.
यावेळी परंडा विधानसभा प्रमुख बाळासाहेब क्षिरसागर, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुदाम पाटील, सरचिटणीस संतोष सुपेकर, भुम कृषी बाजार समिती संचालक अंगद मुरुमकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष प्रदीप साठे, अल्पसंख्याक ता.अध्यक्ष अब्दुला लहाजी, ता. प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, संतोष औताडे, चंद्रकांत गवळी, मुकुंद वाघमारे, हेमंत देशमुख, शांतीराज बोराडे, समाधान अंधारे, शरद चोरमले, रघुनाथ वाघमोडे, गजेंद्र धर्माधिकारी, ज्ञानेश्वर सानप, सुहास सानप, भाऊसाहेब कुटे, लक्ष्मण भोरे, सुब्राव शिंदे, तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.