धाराशिव (प्रतिनिधी)-15 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे होणारा महाधिवेशन ला राज्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी लाखोच्या संख्येने सहभागी व्हावे. महाराष्ट्रातील सर्व राज्य सरकारी कर्मचारी हे आपलेच बंधू भगिनी असून या कर्मचाऱ्यांच्या न्याय अशा जुन्या पेन्शन मागणीसाठी आपण दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी जो महामेळावा शिर्डी येथे आयोजित केला आहे त्या जुनी पेन्शन महाअधिवेशनास / आंदोलनास आमच्या महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच, राज्य शाखा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एकल सेवा मंचचा संपूर्ण शक्तीनिशी पाठिंबा आहे.
संघटनेचे अनेक कार्यकर्ते तन-मन-धनाने या महामंडळात उपस्थित राहतील, हा मेळावा यशस्वी करून जुन्या पेन्शनची न्याय मागणी पूर्ण करण्यासाठी संघटना कायम आपल्या सोबत आहे. जुन्या पेन्शनची ही मागणी सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची व संवेदनशील आहे, शासनाने ती मागणी मान्य करावी म्हणून महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंच राज्य शाखा महाराष्ट्र राज्य या आंदोलनात सहभागी होणार आहोत. या आंदोलनात महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.