तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकमान्य युवा मंच, अयोध्या नगर तुळजापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव 2024 गणेशाची आरती तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली. याप्रसंगी, विनोद गंगणे, सचिन रोचकरी,  धैर्यशील दरेकर, आनंद कंदले, शांताराम पेंदे, अविनाश गंगणे, नरेश अमृतराव, मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार हाजगुडे, उपाध्यक्ष राहुल कणे, सचिव सचिन कोठावळे, कोषाध्यक्ष आण्णासाहेब कणे, विजय नवले, बळीराम माने, गणेश चादरे, अजय कांबळे, गणराज पवार, विकास भिरंगे, श्यामराव दिंडोरे, ओंकार दिंडोरे, अजिंक्य नवले,सत्यनारायण चादरे, ऋषिकेश डांगे, ओंकार मुळे मधुसूदन चादरे, दत्तराज डांगे व महिला भगिनी आदि मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी, राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले की, गेल्या 24 वर्षांपासून लोकमान्य युवा मंच हे भारतीय संस्कृतीचा वारसा जपत विविध समाजोपयोगी, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत आह हे पाहून आनंद वाटला.  लोकमान्य युवा मंचच्या गणेशोत्सवात महिलांचा सहभाग ही विशेष नोंद करून घेण्यासारखी बाब आह.  याप्रसंगी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अयोध्या नगरीमध्ये सांस्कृतिक सभागृह देण्याचे आश्वासन दिले.

 
Top